वर्धा : आम्ही तीन विरुद्ध ते तीन, असा आगामी विधानसभा निवडणुकीचा पवित्रा सांगितल्या जातो. आम्ही तीन म्हणजे भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस, तर विरोधातील ते तीन म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सज्ज आहेत.वर्धा जिल्ह्यात आर्वी, वर्धा व हिंगणघाट येथे भाजपाचे आमदार आहेत. म्हणून देवळी येथे शिवसेना लढणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त झाला.संभाव्य उमेदवार अशोक शिंदे यांनी आज सायंकाळी देवळीत झेंडा फडकविला. पक्षनिरीक्षक म्हणून आमदार भावना गवळी उपस्थित होत्या.

एकत्रित शिवसेनेचे विदर्भ प्रमुख राहिलेले व या देवळी मतदारसंघात दावेदारी करणारे अशोक शिंदे म्हणतात की, तीन मतदारसंघ भाजपाकडे आहेत. त्यावर दावा आम्ही करीत नाहीच. पण देवळीत मागच्या निवडणुकीत शिवसेना लढली, म्हणून आमचा दावा कायम आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भावना गवळी यांना पाठवून दावा पक्का केला. मुख्यमंत्री ठाम असल्याने आज हा कार्यक्रम केला, असे अशोक शिंदे म्हणाले.

Nephew of Datta Menghe and Chief Steward of Meghe University Dr Uday Meghe joins Congress by leaving BJP
दत्ता मेघेंचे पुतणे काँग्रेसमध्ये दाखल; भाजपातील बड्या कुटुंबास खिंडार…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
wardha sagar meghe
“उदय मेघेने पाठीत खंजीर खूपसला, त्याला पाडणारच”, ‘यांनी’ व्यक्त केला संताप
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Mahad Assembly Constituency in Vidhan Sabha Election 2024, Snehal Jagtap, Bharat Gogawale
कारण राजकारण : घटत्या मताधिक्याची भरत गोगावलेंना चिंता
sharad pawar nitin Gadkari marathi news
शरद पवार पुन्हा वर्धा जिल्हा दौऱ्यावर, सोबत नितीन गडकरीही… काय आहे विशेष जाणून घ्या
uday meghe joined congress marathi news
“काँग्रेस प्रवेश ही वैचारिक निष्ठा”, उदय मेघेंची स्पष्टोक्ती…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा >>>संत गजानन महाराजांची पालखी स्वगृही; शेगावात लाखांवर भाविकांची मांदियाळी

भाजपासाठी हा धक्का ठरू शकतो. कारण जिल्हा १०० टक्के भाजपामय करण्याचा निर्धार सर्व भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आता शिंदे शिवसेना देवळी सोडायला तयार नसून एक ही जागा हवीच, असा हट्ट धरून बसली आहे. त्या जागेवर एकनाथ शिंदे समर्थक माजी मंत्री अशोक शिंदे दावा करीत असून आज त्यांनी अधिकृत घोषणा केली. त्यामुळे गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपा पदाधिकारी व अपक्ष लढून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राजू बकाने यांचे काय, असा प्रश्न भाजपा नेतृत्वास भेडसावत आहे.

हेही वाचा >>>रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’मुळे अनेक गाड्या रद्द

देवळी येथे मागील विधानसभा निवडणुकीत संयुक्त सेनेतर्फे  सहकार नेते समीर देशमुख लढले होते. ते तिसऱ्या नंबरवर गेले. तर बकाने अपक्ष लढून दुसऱ्या क्रमांकवर राहले. आमदार काँग्रेसचे  रणजित कांबळे झाले. पण ही देवळी जागा अधिकृतपणे  शिवसेनेस भाजपने त्यावेळी दिली. म्हणून जागा वाटप करतांना सेना शिंदेचा हक्क कायम राहील, असा सूर आहे.

पण देवळी विधानसभा मतदारसंघ कसा सोडणार, हा भाजपचा प्रश्न आहे. कारण ईथे भाजप संघटनेचे जाळे आहे. शिंदे सेना नावालाही नाही. साधे फलक पण ते ठाकरे सेनेच्या फलकवर लावतात. शिंदे गटाचा एकही पदाधिकारी नाही. केवळ या मतदारसंघातील दोन गावे येतात, म्हणून दावा करीत असतील तर ते हास्यस्पद आहे, असे भाजप नेते म्हणत आहे.