बुलढाणा : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतात उमटण्याची चिन्हे आहे.

आज बुलढाणा येथे निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलतांना आमदार संजय गायकवाड यांनी हे स्फोटक विधान केले. राहुल गांधी यांच्या कथित आरक्षणविरोधी विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे. राज्यात आणि भारत देशात आरक्षणावरून आग भडकवली असताना राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन हे विधान करून आपली आरक्षणविरोधी भूमिका मांडली आहे.

BJP leader Ashish Deshmukh alleged that Anil Deshmukh is trying to take credit for Ladki Bahin Yojana
‘लाडकी बहीण’ योजनेवरून भाजपचे आशीष देशमुख यांचा अनिल देशमुखावर आरोप..
Governor C P Radhakrishnan addressed farmer issues and suicides stating government is taking serious measures
बुलढाणा : राज्यपाल म्हणतात,‘शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी…’
Devendra Fadnavis Statement about Teli Samaj Wardha
वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…
father himself sexually abused his minor daughter in amravati
अमरावती : धक्कायदायक! वडिलांचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
jawans killed seven Naxalites during encounter in Chhattisgarhs Dantewada
गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…
rohini khadse
“लोकसभेत जमिनीवर आले म्हणून बहिणी लाडक्या झाल्या! दीड हजार दिले , पाच हजार उकळले”, रोहिणी खडसे यांची टीका
nana patole
“महाराष्ट्राची मान शरमेने खाली, हे सरकार फक्त मलई खाण्यात…”, पटोलेंकडून टीकांचा भडिमार
belora airport
अमरावती: “अपूर्ण विमानतळाचे लोकार्पण करण्‍याचा घाट..”, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांची टीका
samruddhi expressway accident 25 victim families
समृद्धी महामार्ग अपघात: २५ पीडित कुटुंबांची दीड वर्षांपासून ससेहोलपट

हे ही वाचा… भरधाव वाहनांमुळे विद्यार्थी भयभीत! नागपुरातील ‘या’ शाळेसमोरील स्थिती; अपघाताची टांगती तलवार…

याचा अर्थ त्यांना आरक्षण संपवायचे आहे. दलित, आदिवासी, ओबीसी यांना इतरांसमवेत, पुढारलेल्या जातींसोबत येण्याची, आर्थिक-शैक्षणिक प्रगती साधण्याची संधी मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमाने आरक्षण दिले आहे. मात्र राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवर आरक्षण विरोधी। भूमिका मांडली आहे. या राहुल गांधीची जीभ छाटणाऱ्याला माझ्याकडून अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देईल या स्फोटक विधानाचा आमदार संजय गायकवाड यांनी चर्चेदरम्यान पुनरुच्चार केला. लोकसभा निवडणुक प्रचारात याच नेत्याने आणि त्यांच्या। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने , भारतीय जनता पार्टी केंद्रात पुन्हा सत्तेत आली तर संविधान बदलतील, आरक्षणाला धोका आहे, असा फेक नरेटिव्ह तयार केला होता. आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडली असून त्यांचा दलित आदिवासी बदलचा कळवळा वरवरचा असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पडसाद उमटणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन दिवसांनंतर, १९ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत. बुलढाणा शहरात हे तिन्ही दिग्गज नेते जवळपास अर्धा दिवस मुक्कामी असतील. आमदार संजय गायकवाड यांच्या या प्रक्षोभक विधानाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पडसाद उमटण्याची चिन्हे आहे.

हे ही वाचा…Mahayuti Seat Sharing Deal : भाजपला बालेकिल्ल्यातच हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागणार ?

बुलढाण्यात लोकशाही नसून गुंडशाही – जयश्री शेळके

काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी या विधानाचा निषेध नोंदवत बुलढाण्यात लोकशाही नसून गुंडशाही आहे, असा आरोप केला. आमदार संजय गायकवाड यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार गायकवाड यांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असा प्रकार आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांची भूमिका वारंवार लोकशाही आणि आरक्षणविरोधाची राहिली आहे. हे देशातील जनतेला माहीत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. राहुल गांधी यांनी सातत्याने जातीय जनगणना व्हावी, अशी मागणी रेटून धरली आणि आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे, असे जयश्री शेळक यांनी सांगितले.