नागपूर: उपराजधानीतील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील भीमनगर परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यातच हे प्रकरण दडपण्यासाठी पतीकडून पत्नीला ह्रदयविकाराचा आल्याचा देखावा केला गेला. दरम्यान या घटनेबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.

जॉन्सन प्रल्हाद मांडपे (४१) असे आरोपीचे नाव आहे. तर शीतल जॉन्सन मांडपे (३९) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भीमनगर परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून २१ मे २०२५ दरम्यान खून केला. त्यानंतर प्रथम हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु महिलेच्या कुटुंबीयांना शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान आपला भिंग फुटेल या भीतीने पतीने पळ काढला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मागील ७ वर्षांपासून घरगुती वादामुळे पती- पत्नी दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. या जोडप्याला दोन मुले आहे. दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
एम्सच्या अहवालातून खूनाचे प्रकरण उघडकीस

आरोपी पतीने २२ मे रोजी सकाळी पत्नीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे कळल्यावर घटनास्थळ गाठल्याचा आव आणला. यावेळी महिलेच्या कुटुंबियांना महिलेच्या शरीरावर जखमा दिसल्या. त्यावर महिलेची आई गोतमी चौव्हाण यांनी शंका व्यक्त केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात हलवले गेले. सोबत पोलिसांनाही माहिती दिली गेली. दरम्यान आपण खून केल्याचे उघडकीस येण्याचा धोका बघता पतीने खूनाच्या तिसऱ्या दिवशी घरातून पळ काढला. शेवटी एम्सच्या शवविच्छेदन अहवालातून गळा दाबून खूनचा उलगडा झाल्यावर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे.

कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात मागील काही दिवसांपासून खूनाच्या घटना वाढतांना दिसत आहे. त्यापैकी बहुतांश प्रकरणे शुल्लक कारणातून आहे. परंतु वाढत्या हत्यांच्या प्रकरणामुळे नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे गृह शहर नागपूर आहे. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्था सुरक्षीत ठेवण्यासाठी पोलीस आणि सरकार काय उपाय करणारय़ याकडे सगळ्या नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.