नागपूर : विदर्भ म्हटला की ‘शेतकरी आत्महत्या’ हाच प्रश्न डोळ्यापुढे येते. आता तर राज्याच्या सत्तेची धुराच मागील काही वर्षांपासून विदर्भातील नेतृत्वाकडे आहे. पण आत्महत्या काही थांबत नाही. पश्चिम विदर्भात तर हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, ऑगस्ट महिन्याच्या ३१ दिवसात फक्त दोन जिल्ह्यात १०१् शेतकऱ्यांनी अस्मानी, सुलतनी संकटाने कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. वर्तमानपत्राने दखल घेतली, पण ज्यांनी दखल घ्यावी त्या सरकारने याआकड्याकडे दुर्लक्ष केले. हजरो कोटीं खर्च करून नवीन नागपूर विकसीत करण्याची घोषणा केली. त्याच नागपुरात बुधवारी अध्यात्मिक गुरू श्री.श्री. रविशंकर आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली.
विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था किती दयनीय आहे, हे शेतकरी करीत असलेल्या आत्महत्यांच्या आकड्यावरून स्पष्ट होते. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे विशेषत: यवतमाळ, अमरावदती या दोन जिल्ह्यात हा प्रश्न अत्यंत गभीर असल्याचे आकडे बोलतात. संपलेल्या ऑगस्ट महिन्यात (३१ दिवस) वरील दोन जिल्ह्यात तब्बल १०१ शेतकऱ्यांनी आत्मह्त्या केल्या. यात यवतमाळ जिल्ह्यातील ४३ तर अमरावती जिल्ह्यातील २३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित संख्या ही इतर जिल्ह्यातील आहे. सरकार दरबारी ही बाब केवळ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या एक लाखाची मदत एवढ्या पुरतीच मर्यादित आहे.
शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर कसे काढावे यासाठी स्वयंसेवी संस्था, आध्यातिमक गुरूंच्या माध्यमातून यापूर्वी प्रयत्न झाले. पण अजूनही आत्महत्या थांबल्या नाहीत. अध्यात्मिक गुरू श्री.श्री.रविशंकर यांनी यापूर्वी या प्रश्नावर मार्ग काढण्याच्या अनुषंगाने पदयात्रा केली होती. बुधवारी ते नागपुरात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी शेतकऱी आत्महत्या संदर्भात भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाले श्री.श्री. रविशंकर
विदर्भात शेतकऱ्यांचा आत्महत्या अजूनही सुरू आहेत. शेतकऱ्यांचे आत्मबल क्षीण होत आहे, यापूर्वी अनेक अडचणीतून आपण मार्ग काढला आहे. काही वर्षांपूर्वी ३७० गावागावांत पदयात्रा काढली. १० वर्षांनंतर पुन्हा पदयात्रा काढण्याची वेळ आली आहे, असे मत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.