scorecardresearch

Premium

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

घराभोवतीच्या बागेत एखादे सुंदर कारंजे बागेची शोभा वाढवते. अनेक गृहसंकुलांमध्ये बागेत कारंजी अथवा छोटेसे तळे करतात. या जलाशयामुळे हवेत गारवा निर्माण होतो.

districts maharashtra yellow alert chance cyclone formation Bay of Bengal possibility of rain
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: मोसमी पावसाने राज्यातून ‘एक्झिट’ घेतली, पण अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. पुढील २४ तासांसाठी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अवकाळीने जोर धरल्यामुळे आता राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. भरीस आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं आता या संकटातून सावरण्याचेच प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील हे अवकाळीचं वातावरण आणखी काही दिवसांसाठी कायम राहणार आहे. येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली असून, याच धर्तीवर ‘यलो अलर्ट’ही देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

loksatta analysis global recession created challenges for the it sector
विश्लेषण: आयटीतील घसघशीत पगाराला मंदीची कात्री?
Big increase in basmati exports 15 percent increase in exports is possible by the end of financial year
बासमतीच्या निर्यातीत मोठी वाढ; आर्थिक वर्षाअखेरीस निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ शक्य
elephant attack
हत्तींचा वाढता हैदोस; केरळमध्ये माणूस-प्राणी संघर्ष शिगेला, यामागचे नेमके कारण काय?
buldhana, farmer died in leopard attack, dnyanganga wildlife sanctuary
बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

हेही वाचा… मनोज जरांगेंची अकोला चरणगावमध्ये सभा; पश्चिम विदर्भात ४ व ५ डिसेंबरला दौरा

सध्याच्या स्थितीत अरबी समुद्राच्या नैऋत्येपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळे अवकाळी इतक्यात पाठ सोडणार नसल्याचे चित्र सध्या आहे. दरम्यान, राज्यात सध्या मान्सूनने माघार घेतली असली तरीही अवकाळी पावसाचे थैमान सुरुच आहे. ज्यामुळे जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदियामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामानात बदल होत असून कमाल आणि किमान तापमानात चढउतार दिसून येत आहे. दरम्यान, येतया एक डिसेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Some districts of maharashtra have been given a yellow alert due to the chance of cyclone formation in bay of bengal and possibility of rain rgc 76 dvr

First published on: 28-11-2023 at 16:54 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×