गोंदिया : दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडकपूर रेल्वे विभागाच्या संत्रागाछी रेल्वे स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत होणार आहे. काही पॅसेंजर गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. हे काम उद्या, ११ जून रोजी केले जाईल, परिणामी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या काही गाड्या उशिराने सुटतील. या कामामुळे या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द.पू.म. रेल्वेच्या ३ प्रमुख गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल ज्यामध्ये प्रामुख्याने तीन गाड्या प्रभावित होतील. ज्यामध्ये ट्रेन क्रमांक १२८६० हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेस ११ जून २०२३ रोजी हावडाहून सुटण्यासाठी ०२ तास उशीर होईल. त्याचप्रमाणे हावडा – मुंबई मेल क्रमांक १२८१० हावडाहून ०४ तास ३० मिनिटे उशिराने, तर ट्रेन क्रमांक १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस ०३ तास उशिराने धावणार आहे.

हेही वाचा – १६ जूनपासून गोव्यात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव; विदर्भातून शेकडो पदाधिकारी सहभागी होणार

प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करून रेल्वे प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा करण्यात आली आहे . सदर माहिती गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर कुशवाह यांनी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्याचे कळविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some trains running through south east central railway will leave late sar 75 ssb
First published on: 10-06-2023 at 13:52 IST