नागपूर : अपंगांसाठी राज्यातील पहिले विशेष उद्यान नागपुरात सुरू करणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केली. दोन ते तीन महिन्यात पूर्व नागपुरात लता मंगेशकर उद्याना शेजारी अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे उद्यान तयार होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

हेही वाचा… दोन वर्षांच्या खंडानंतर उद्या नागपुरात निघणार प्रसिद्ध काळी व पिवळी मारबत

राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग सहायता योजना अंतर्गत साहित्य वाटप गडकरी यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत आहे. ४३ प्रकारचे विविध साहित्य व उपकरण ज्येष्ठ व अपंगांना नि:शुल्क वाटप केले जाणार आहे.

हेही वाचा… ‘सेक्स्टॉर्शन’ गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ; राज्यात मुंबई प्रथम तर नागपूर, पुणे दुसऱ्या स्थानावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उद्यानात अपंगांसाठी सर्व प्रकारचे क्रीडा साहित्य, स्पीच थेरपीचे साधनं, प्रशिक्षक उपलब्ध असेल. अपंगांसाठी कृत्रिम साहित्य वाटप आतून कामाचे समाधान मिळते. उपकरणांचा अनेकांना फायदा झाला. कोट्यवधी रुपयांचे साहित्य वाटप देशात प्रथमच नागपुरात केले जात आहे, याचे समाधान आहे, असे गडकरी म्हणाले.