प्रेयसीसोबत तिच्या घरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना प्रतापनगरात उघडकीस आली. अमित बहिरे (३३, शिवनगर, सिंधी कॉलनी) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित बहिरे हा विवाहित असून त्याला आठ वर्षांचा मुलगा व नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी आहे. त्याने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे पत्नीच्या कुटुंबाशी त्यांचा संबंध नव्हता. त्याची गेल्या सात वर्षांपूर्वी शीतल (३४, बदललेले नाव) हिच्याशी ओळख झाली. शीतलला १२ वर्षांची मुलगी असून तिच्या पतीचे निधन झाले आहे.

ती खासगी काम करते. दोघांचे सूत जुळले आणि तो थेट शीतलच्या घरी येऊन राहायला लागला. अमित हासुद्धा खासगी नोकरी करतो. शीतलशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पत्नीला लागली. त्यामुळे तिने भरोसा सेलमध्ये पती व त्याची प्रेयसी शीतलच्या विरुद्ध तक्रार दिली. भरोसा सेलने त्यांच्यात समेट घडवून आणला. तेव्हापासून तो पत्नीला घरखर्चाला पैसे द्यायला लागला. मात्र, तो प्रेयसीच्या घरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्येही राहायला लागला.

हेही वाचा : प्रशांत किशोर महाराष्ट्राच्या राजकारणात? वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाबाबत बैठक घेणार

रविवारी दुपारी अमित हा शीतलच्या घरी आला. तासाभराने शीतल आपल्या मुलीला घेऊन सीताबर्डीत खरेदीसाठी गेली. ती चार वाजता परत आली असता अमित तिला मृतावस्थेत दिसला. तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह मेडिकलमध्ये पाठवला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा : नागपूर : लग्नाला कुटुंबीयांनी केलेल्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमितची पत्नी ९ महिन्यांची गर्भवती आहे. तिला नुकतेच प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. येत्या दोन दिवसांत अमित हा बाप बनणार होता. परंतु, होणाऱ्या बाळाचा चेहरा बघण्यापूर्वीच अमितचा प्रेयसीच्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी प्रतापनगर पोलीस घातपाताच्या दृष्टीनेही तपास करीत आहेत.