लोकसत्ता टीम

नागपूर: हिंगणा तालुक्यातील गुमगावमार्गे समृद्धी महामार्गाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग (३५३) रविवारी झालेल्या पावसाने संपूर्णपणे चिखलाने माखला आहे. या महामार्गाचे काम मागील तीन वर्षापासून अपूर्ण आहे. कंत्राटदाराने २ किमीच्या रस्त्यावर केवळ मुरूम टाकून ठेवला आहे अवकाळी पावसाने या मार्गावर पूर्ण चिखल झाला. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच अडचण होत आहे.

हिंगणा येथून समृद्धी महामार्गप्रवेशव्दार व पुढे गुमगाववरून वर्धा महामार्गाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे (क्र ३५३ (आय)) चे काम समृद्धी महामार्गाचे काम सुरु होण्यापूर्वी सुरू झाले होते. एका कंत्राटदाराकडून काढून हे काम दुसऱ्या कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले. परंतु कामात फारशी प्रगती झाली नाही . सुमारे दोन किमी रस्त्यावर केवळ मुरूम टाकण्यात आला आहे. हिवाळ्यात रस्त्यावरची धूळ शेतातील पिकांवर उडत होती. त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते.

आणखी वाचा- नागपूर: जावई दारू पिऊन आला, मध्यरात्री सासूवर बलात्कार केला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंगणा येथून या मार्गाने समृद्धी महामार्गाकडे तसेच हैद्राबाद महामार्ग कडे जाण्यासाठी अनेक मोठी वाहने जातात. छोटे वाहने व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे मुरूम असलेल्या दोन किमी भागात पूर्ण चिखल पसरला आहे. वाहन चालवताना याचा त्रास होत असून तात्काळ या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.