वर्धा: लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक प्रकार करण्याची बाब नवी नाही. त्यामुळे हे असे कां व कशासाठी अशी उत्सुकता निर्माण होते व समस्या लोकांपुढे येते. तसलाच प्रकार आज सायंकाळी घडला. देवळी येथील युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी सव्वा किलोमीटर लोटांगण आंदोलन केले.रस्त्यावर लोटत लोटत त्यांनी तहसील कार्यालय गाठले. बस स्थानक ते तहसील कार्यालय अश्या अंतरात ते लोटत कां जात आहे, म्हणून लोकांनी गर्दी केली. तेव्हा हा हा व्यक्तिगत नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असल्याचे दिसून आले.

सरकार काळजी घेत नाही, असे स्पष्ट करताना ते म्हणाले की. आता मुख्यमंत्रीच दखल घेतील. गेल्या २५ दिवसांपासून पाऊस कोसळतो. शेतात पाणी साचून तलाव झाले. म्हणून ओला दुष्काळ जाहीर करीत शेतकरी वर्गास मदत मिळाली पाहिजे. सोयाबीन व कापूस पिकावर रोगराई पसरली. पाने गळत आहे. म्हणून उत्पन्नावर घट होणार. चालू वर्ष कुटुंब कसे पोसायचे ही चिंता लागली आहे. ही स्थिती वर्धा जिल्ह्यात सर्वत्र आहे. सर्व शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळावी, गेल्या वर्षीचा १०० टक्के पिक विमा मिळावा, सर्व पांधण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण व्हावे,म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा. त्यामुळे काही सवलती मिळतील. नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच पिक विमा व वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे दावे निकालात काढावे, सिबिल स्कोर अट रद्द करीत पीक कर्जाचे वाटप करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशा व अन्य मागण्या करण्यात आल्या.

pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
vijay wadettiwar criticized shinde govt
“…पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”; धाय मोकलून रडणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवारांचं टीकास्र!
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत
More than a thousand people on waiting list right to education admission process for all
यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

हेही वाचा >>>अमरावती: शेतकऱ्यांच्‍या उपेक्षेने काँग्रेस संतप्त, जोरदार घोषणाबाजी करीत…

या अभिनव आंदोलनात प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, समीर सरजे, लोमर्श बाळबुधे, स्वप्नील मदणकर, मनोज नागपुरे, संदीप दिघीकर, रुपराव खैरकार, विजय धांगे, विशाल पेंदाम, अमोल भोयर, विनय महाजन, मनीष पेटकर, उमेश ठाकरे, प्रशांत वानखेडे, प्रदीप खैरकार, शरद भोयर, सचिन धांडे तसेच परिसरातील शेतकरी बंधू सहभागी झाले होते. आंदोलनास मिळत असलेला प्रतिसाद पाहून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे लोटांगण आंदोलन देवळी शहरात लक्ष वेधून घेणारे ठरले. या आंदोलनाने शासनाचे डोळे उघडतील अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सध्या सततच्या पावसाने शेतकरी घायकुतीस आल्याचे चित्र आहे. पण लक्षात कोण घेतो, अशी स्थिती असल्याने हे आंदोलन चर्चेत आले आहे.