वर्धा:आता प्रौढ असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या लहानपणी हा प्राणी निश्चितच पाहला असेल. पावसाळ्यात हमखास दर्शन देणारा लालरंगी व रेशमवर्णी म्हणून लोभस दिसणारा हा किडा आता दुर्मिळ झालाय. मृगाचा किडा, गोसावी, राणी किडा व अन्य नावे असलेल्या या किड्यास इंग्रजीत रेड व्हेलवेट माईट म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याचे नाव होलोस्त्रिक आहे.

प्राणी, पक्षी, कीटक यांची संख्या कमी होत असून हा किडा सुध्दा त्यास अपवाद नाही. हा गोचीडचा भाऊबंद. मात्र तो रक्त पित नाही. त्याचे शरीर व पाय पण मखमली गालिचा प्रमाणे असतात. त्याच्या पाठीवर थोडासा दाब दिला की तो आपले सर्व पाय एकवटून निपचित पडतो. हा अनुभव आपल्या पैकी अनेकांनी घेतला असेल. पूर्वी या गोंडस किड्यांची संख्या भरपूर असायची.

हेही वाचा… नागपूर शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ; सहा महिन्यात ५७६ अपघात, १४१ जणांचा मृत्यू

पहिला पाऊस पडला की यांची झुंबड उडत असे. लहान मुलं यास खिशात, आगपेटीत जपून ठेवायचे. केवळ पंधरा दिवस त्यांचे वास्तव्य दिसायचे. नंतर ते लुप्त होत. आज प्रौढ वर्ग ते पाहण्यास व आठवणींना उजाळा देण्यास आतुर असतात. पण गोसावी दिसेनासा झाला आहे. कीटक अभ्यासक प्रवीण कडू म्हणतात की या व अश्या अन्य किड्यांचे संवर्धन करायचे असेल तर माती प्रदूषणास आळा बसणे आवश्यक आहे. नाहीतर ते कायमचे विलुप्त होतील.

हेही वाचा… …अखेर ‘बाईपण भारी देवा’चे फलक झळकले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निसर्ग सरक्षणासाठी गोसावी महत्त्वपूर्ण ठरतात. बुरशीचे शत्रू असलेल्या कीटकांच्या अंड्यांना खावून संपविण्याचे कार्य हे करतात. हे इतर प्राण्यांचे रक्त पित नाहीत. पाला पाचोळा कुजविण्यासाठी बुरशी अत्यंत महत्वाची असते. बुरशी नसेल तर पाला कुजनार नाही व परिणामी नवी माती तयार होणार नाही. म्हणून बुरशी नष्ट करणाऱ्या कीटकांचा संहार करणारा गोसावी जगला पाहिजे, असे कडू सांगतात.