बुलढाणा: जुलैमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मदत निधी ऑक्टोबरमध्ये मंजूर करण्यात आल्याने लाखो शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी महसूल विभागाने मदत निधी संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केले आहे. त्यात जून, जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास, २ हजार हेक्टर मर्यादेत बाधित १ लाख ३४ हजार ६०७ हेक्टर शेतजमीनीवरील नासाडीसाठी ही मदत आहे. तसेच यातून १ लाख ४८ हजार ४२३ बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी ४० लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच खरडून गेलेल्या १२ हजार ९२५ हेक्टर जमिनीच्या भरपाईसाठी ३५ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे.

हेही वाचा – खगोलप्रेमींसाठी आजपासून पर्वणी! सलग पाच दिवस दिसणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक; जाणून घ्या वेळ आणि दिशा…

हेही वाचा – “सव्वालाख स्वयंसेवक ‘इंडिया’चा प्रचार करणार”, योगेंद्र यादव यांची माहिती; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलै महिन्यात जिल्ह्यातील जळगाव, संग्रामपूर आदी तालुक्यांना जबर तडाखा बसला होता. यामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिके, फळबागांचे नुकसान झाले होते. तसेच हजारो हेक्टर जमीन खरडून गेली होती.