नागपूर : राज्याच्या काही भागांत आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जुलै महिन्याचा उत्तरार्ध येऊनही राज्यात हवा तसा पाऊस झालेला नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

चांगल्या पावसाशिवाय पेरणी शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान आज राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा – यवतमाळ : आदिवासी आश्रमशाळांतील ३५ विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये प्रवेश, ‘एकलव्य’सह आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा पथदर्शी उपक्रम

हेही वाचा – ‘तरुण पोरगा कुंवारा अन् बापाचे लग्न दुबारा’, निवृत्त शिक्षक नियुक्तीचे संतप्त पडसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशीमसह विदर्भातील अनेक भागांसाठी १२ जुलै ते १६ जुलैसाठी ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.