बल्लारपूर रेल्वेस्थानकावर २ महिन्याच्या बालकाची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी बालकाची १० हजार ५०० रुपयांत विजयवाडा येथे विक्री करणार होते. चंद्रकांत मोहन पटेल (४०, रा. इंदिरानगर, संगम सोसायटी, राणी सती मार्ग, मलाड ईस्ट, मुंबई) आणि द्रौपदी राजा मेश्राम (४०, रा. आयबीएम रोड, धम्म नगर गिट्टीखदान, काटोल रोड, नागपूर), असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

२५ डिसेंबर रोजी नवजीवन एक्स्प्रेसमधून एक दाम्पत्य बालकाची तस्करी करून विजयवाडा येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती नागपूर रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ बल्लारपूर रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी बोगीत जाऊन चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी स्वतःला पती-पत्नी असल्याचे सांगितले.

अंबादास दानवे यांच्या कार्यालयाची जागा कोणाची, सर्व बाहेर काढू; प्रवीण दरेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, बाळ सतत रडत असल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांचे मोबाईल तपासले असता ते मुलाला विजयवाडा येथे विक्रीसाठी नेत असल्याचे उघड झाले. सखोल चौकशीत दोघांनीही तशी कबुली दिली. विजयवाडा येथील युनूस व मुमताज यांना १० हजार ५०० रुपयात बाळ विक्री करण्याचे ठरले होते, असे त्यांनी सांगितले. ही कारवाई रेल्वे पोलीस मानव तस्करी विभागाचे प्रवीण महाजन, संजय शर्मा, सिंह, राठोड यांच्या पथकाने केली.