गडचिराेली : रस्त्यावरील खड्डे चुकवीताना भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दाेघे भाऊ घटनास्थळीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गडचिराेली शहरापासून एक किमी अंतरावर आरमाेरी मार्गावरील प्लाटिनम ज्युबिली शाळेजवळ घडला. पुरुषोत्तम बाबुराव बारसागडे (३८), अंकुश बाबुराव बारसागडे (३२), रा. विसापूर राेड, गडचिराेली, अशी मृतांची नावे आहेत.
धान पिकाला राेग लागला असल्याने कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पुरषाेत्तम व अंकुश दाेघेही भाऊ एकाच दुचाकीने कठाणी मार्गावर असलेल्या शेतात गेले हाेते. फवारणीचे काम आटाेपून ते दुचाकीने घराकडे परत येत हाेते. दरम्यान समाेरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाले.
घटनेची माहिती कळताच गडचिराेली पाेलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ताेपर्यंत दाेघांचाही जीव गेला हाेताे. गडचिराेली शहरापासून अपघात एक किमी अंतरावर सदर अपघात घडला. घटनास्थळी माेठी गर्दी जमली हाेती. ट्रक चालक महेश माणीक पुरी (३२) रा. चंद्रपूर याला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एमएच ३४ बीजी ८६५७ क्रमांकाच्या ट्रक गडचिराेलीवरून आरमाेरीकडे जात हाेता. तर, एमएच ३३ आर ७७८९ क्रमांकाच्या दुचाकीने पुरुषाेत्तम व अंकुश हे दाेघेही भाऊ परत येत हाेते. प्लाटिनम ज्युबिली शाळेजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात पुरुषाेत्तम व अंकुश हे दाेघेही जागीच ठार झाले. नियंत्रणाबाहेर गेलेला ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला गेला.
डाबंरी रस्त्यापर्यंत वाढली झुडपे
गडचिराेली-आरमाेरी हा राष्ट्रीय महामार्ग घाेषित केला आहे. मात्र या मार्ग नावालाच राष्ट्रीय महामार्ग आहे. ज्या ठिकाणी सदर अपघात घडला. त्या ठिकाणी माेठा खड्डा आहे. सदर खड्डा वाचिवण्याच्या प्रयत्नातच अपघात घडला असावा, अशी शक्यता आहे.
– डांबरी रस्त्यापासून जवळपास पाच फुट कच्चा मार्ग व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावर झुडपे, गवत उगवले आहेत. झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. परिणामी रस्त्याच्या बाजूला वाहन गेल्यास हमखास अपघात हाेताे.
बारसागडे कुटुंब झाले पाेरके पुरुषाेत्तम व अंकुश या दाेघांचेही कुटुंब एकत्र राहत हाेते. शेतीकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत हाेते. मात्र, दाेघेही भाऊ मरण पावल्याने कुटुंबावर माेठा आघात झाला आहे. बारसागडे कुटुंबच पाेरके झाले आहे. पुरुषाेत्तमला पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व अंकुशला एक मुलगा आहे. दाेघांच्याही पार्थिवावर बुधवारी बाेरमाळा नदीघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.