नागपूर : महामार्गावर झाडांना पाणी देणाऱ्या टॅंकरवर दुधाची वाहतूक करणारी गाडी धडकल्याने चालकाचा मृत्यू झाला. सोमवारी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. प्रमोद मंसाराम नंदेश्वर (४२, सतीनगर, पारडी) असे अपघाता ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. नंदेश्वर हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीतील रहिवासी होते व कल्याणी ट्रान्सपोर्टमध्ये दुधाची वाहतूक करणारे वाहन चालवायचे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ते (एमएच ३१ एपी ०९६९) या आयशर वाहनाने मजूर प्रमोद सावरकर (हसनबाग) याच्यासोबत जात होते. पांजरा टोल नाक्यासमोर सिंग ढाब्याजवळ (एमएच ०४ ईबी २२८७) हा टॅंकर उभा होता.

त्या टँकरमधून रस्त्यावरील झाडांना पाणी टाकण्याचे काम सुरू होते. चालकाने टॅंकर सुरक्षेची कुठलाही उपाययोजना न करता तसेच कोणताही फलक न लावता उभा केला होता. नंदेश्वर यांना टॅंकर उभा असल्याचा अंदाज न आल्याने त्याला धडक दिली. त्यात नंदेश्वर व सावरकर हे दोघेही जखमी झाले. धडक जोरात झाली असल्याने टॅंकर व दुधाचे वाहन एकमेकांत फसले होते. त्यांना क्रेनच्या सहाय्याने काढावे लागले. त्यानंतर जखमींना मेडिकल रुग्णालयात नेले असता नंदेश्वर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सागर चौधरी यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोरवेलचा ट्रक उलटून एक ठार, दोन जखमी  

‘बोरवेल’ खोदण्यासाठी जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे वळणावर नियंत्रण सुटून अचानक उलटला. या अपघातात एक ठार तर दोन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी उमरेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मोहपा गावात झाला. जिरकू बाबुलाल सेलुकर (२३,रा.सिमालपुरा ता. शहापूर. जि. बैतूल-मध्यप्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. तर राजन उर्फ दादू बैगा (चौपाल ता. जि. सिध्दी) आणि  जारकू उर्फ सम्मू धन्नू उईके (रा.सिंगरई खापा ता.जि. बैतूल) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी आरोपी ट्रकचालक विजयपाल उईके (३३, रा. पवार झेंडा, ता. शहापूर. जिल्हा-बैतूल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.