अमेरिकाप्रमाणे भारतात आणि आता अमरावतीतही ‘गन कल्चर’ फोफावत चालले आहे. अमरावती जिल्‍ह्यातील दर्यापूर येथे मध्‍यरात्रीच्‍या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले दोन तरुण बाजारातून हाती पिस्‍तूल घेऊन फिरतानाची चित्रफित सध्‍या प्रसारीत झाली असून या घटनेने दर्यापुरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा- गडचिरोली : भूमाफियांचा प्रताप; वनविभागाच्या जमिनीवर लेआऊट टाकले, अन्…

दर्यापूर या तालुक्‍याच्‍या मुख्‍यालयी मध्‍यरात्रीच्‍या वेळेस रस्‍त्‍यावर शुकशुकाट असताना दोन तरुण मुख्‍य बाजारपेठेतून जात असल्‍याचे हे दृश्‍य आहे. त्‍यांनी तोंडाला रुमाल बांधला आहे. हे तरुण हाती पिस्‍तूल घेऊन का चालले होते, हा चर्चेचा विषय ठरला आहे. या तरुणांना शोधण्‍याचे आव्‍हान पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा- चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; एका वर्षात ५० बळींची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर्यापूर हे संवदेनशील शहरांच्‍या यादीत नाही. मात्र, चोरी, दरोड्याच्‍या अनेक घटना अलीकडच्‍या काळात घडल्‍या आहेत. या दोन तरुणांनी हाती पिस्‍तूल नाचवत फिरण्‍याचा हेतू काय होता, असा प्रश्‍न विचारला जात असून पोलिसांनी या तरुणांचा शोध घ्‍यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.