वाशिम : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत १८ वर्षांआतील १५ मुलांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या उपस्थितीत हृदय शस्त्रक्रियेसाठी अपोलो हॉस्पिटल मुंबईकडे रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या एका बालकाला कडेवर उचलून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या बालकांसह, पाल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी शाळा व अंगणवाडीमध्ये वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ११ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या २ डी इको संदर्भ सेवा शिबिरामध्ये ३३ मुलांच्या हृदयाची तपासणी केली असता १५ मुलांना पहिल्या टप्प्यामध्ये १९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत त्यांच्यावर मोफत हृदयशस्त्रक्रीया व उपचार करण्यासाठी नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलला रवाना करतेवेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचेसह जिल्हा शल्यचिकित्सक धर्मपाल खेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश मोरे, बाह्यरुग्ण संपर्क अधिकारी डॉ. पराग राठोड, मेट्रन सरिता चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक आकाश ढोके, जिल्हा कार्यक्रम सहायक तुषार ढोबळे, एफएलसी निलेश राजपूत, फार्मासिस्ट राहुल राठोड, अंकुश कदम, विश्वकर्मा खोलगडे, प्रदीप भोयर, ज्योती तायडे, दिशा राठोड, दीपाली उबाळे, पुष्पा वेळूकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा – नागपंचमीला सर्वत्र नागपूजा, मात्र या गावात केल्या जाते शहिदांना नमन, कारण..

हेही वाचा – गोंदिया : नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही गरीब कुटुंबातील मुले असून महागड्या शस्त्रक्रिया करणे त्यांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र, प्रशासनाची साथ मिळाल्याने त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.