नागपूर : मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेच्या अत्यंत महत्त्वाची असल्याने मराठी आणि हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट देऊन दोन भाऊ एकत्र येणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचची चर्चा माध्यमात आहेत. मात्र गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक द्विस्ट आला. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही भावांना भाजपला एकत्र येऊ द्यायचे नसल्याचा आरोप केला आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरवल्याचे या भेटीगाठीवरून दिसून येत आहे.

ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाचे आम्ही स्वागत केले होते. कुटुंब एकत्र येणार असेल तर त्याला आमचे समर्थन होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्याला नाही. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणे भाजपला परवाडणारे नव्हते हे मात्र नक्की. ते भाजपला होऊ द्यायचे नाही. इडीची भीती दाखवून राज ठाकरे यांना दूर केले जाईल ही शंकाही व्यक्त होत होती. मात्र या भेटीगाठीने राज ठाकरे यांच्यावरच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोले यांचे समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने लष्कराच्या कतृत्वाचे श्रेय घेत वेगवेगळ्या राज्यात प्रचार करीत आहेत, त्यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूर व्हिडीओ गेम आहे काय, असा सवाल केला. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले, ते काय बोलले हे मी ऐकले नाही. ऑपरेशन सिंदूर झाल्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हल्ला करणार आहोत, जागा रिकामी करा से पाकिस्तानला सांगितले होते. त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हल्ला करण्यापूर्वी कोणी शत्रू राष्ट्राला कळवते की आम्ही ऑपरेशन करणार आहोत. हेच नाना पटोले बोलले. यात गैर काय असेही वडेट्टीवार म्हणाले.