नागपूर : विदर्भातील तब्बल ४१ मतदार संघात २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे विदर्भातील मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला फायदेशीर ठरेल अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये विदर्भातील ६२ पैकी ५० मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली होती. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेले आहे.

यात विदर्भातील चिखली, मेहकर, जळगाव जामोद, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मुर्तीजापुर, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा, उमरेड, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, कामठी, रामटेक, गोंदिया, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, वरोरा, वणी, राळेगाव, यवतमाळ, आर्णी, पुसद, उमरखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र, विदर्भातील एका मतदारसंघात यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्षेनेते राहूल गांधी यांची सभा झाली आहे. या मतदारसंघात विक्रमी म्हणजे ८१ टक्के मतदान झाले आहे. याविषयी जाणून येऊया…

हेही वाचा…अमरावतीत भरदिवसा युवकाची चाकूने भोसकून हत्‍या

वैदर्भियांकडून भरभरून मतदान

दरम्यान विदर्भातील मतदान वाढलेल्या ४१ मतदारसंघात ३० मतदारसंघ असेही आहे, जिथे मतदानाची टक्केवारी फक्त २०१९ च्या तुलनेतच नव्हे, तर २०१४ च्या तुलनेतही वाढली आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये तब्बल ५० मतदारसंघात विदर्भात मतदानाची टक्केवारी घसरली होती. मात्र यंदा वैदर्भीय मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे ४१ मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे. २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी झालेले विदर्भातील मतदारसंघात मलकापूर, बुलढाणा, सिंदखेड राजा, खामगाव, अकोट, बाळापुर, रिसोड, वाशिम, कारंजा, काटोल, सावनेर, हिंगणा, तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, आमगाव, राजुरा आणि दिग्रस यांचा समावेश आहे.

हेही वाचा…दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली मते निर्णायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा झाला सभांचा परिणाम

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर राहूल गांधी यांचीही सभा झाली होती. विदर्भात चिमूर मतदारसंघात यंदा ८१.९५ टक्के मतदान झाले आहे. विदर्भातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत येथे विक्रमी मतदान झाले आहे. याखालोखाल ब्रम्हपूरी मतदारसंघातही ८०.५४ टक्के मतदान झाले. चिमूदरमध्ये तब्बल २ लाख ३० हजार मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे मतदानाचा टक्का वाढला अशीही चर्चा आहे. परंतु वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याची उत्सुकता आहे.