वर्धा : मालदार संस्थेचा पदाधिकारी होण्याच्या मोहापोटी फसवणूक करण्याची बाब अडचणीत आणणारी ठरली. हिंगणघाट येथील माहेश्वरी युवक मंडळ ही प्रतिष्ठित संस्था आहे. संस्थेचा कारभारी होण्यासाठी रामकुमार जुगलकिशोर डागा, विनोद अशोक मेहता, मुरली रामचंद्र लाहोटी, संजय गणेशीराम डालीया, आशिष वल्लभदास राठी, उदय विजसिंग मेहता, प्रेमकुमार राजुकुमार जाजू, सर्व राहणार हिंगणघाट यांनी ८ जानेवारी २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत माहेश्वरी मंडळाचे ट्रस्टी व सहायकाच्या परवानगी शिवाय शेड्युलच्या प्रतीत फेरफार केली.

हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले, १३ हजार ३९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच शेड्युल एक मध्ये त्यांनी त्यांची नावे टाकली. अश्याप्रकारे त्यांनी स्वतःला विश्वस्त दाखवून फसवणूक केली. मंडळाच्या मारोती वॉर्डातील काही सदस्यांनी याबाबत तक्रार केली. त्या आधारे हिंगणघाट पोलीसांनी सात जणांविरोधात गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला आहे. या घटनेने समाजात चांगलीच खळबळ उडाली आहे.