वर्धा : विविध संघटनांच्या भारतीय लोकशाही अभियानतर्फे रविवारी सायंकाळी मोठा मूक मोर्चा निघाला. देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहे. मणिपूर येथे घडलेली घटना तर लोकशाहीसाठी कलंक ठरली. तरीही केंद्र सरकार जागे होत नाही, असा आरोप करीत निषेध नोंदविण्यात आला.

हेही वाचा – वाघाच्या शिकारप्रकरणी बावरिया टोळीचे १६ जण ताब्यात; वाघाची तीन नखे, शस्त्र जप्त

हेही वाचा – शेतातील चिखलात उतरून नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केली भात रोवणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मणिपूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी झाली. मूक मोर्चात चाळीस संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मगन संग्रहालय ते शिवाजी चौक असा हा मोर्चा फिरला. यात नई तालीमच्या सुषमा शर्मा, सर्व सेवा संघाचे अविनाश काकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, अनिसचे संजय इंगळे तिगावकर, युवा फोरमचे सुधीर पांगुळ, महाराष्ट्र अनिसचे गजेंद्र सुरकार यांनी नेतृत्व केले. तसेच आयटकचे दिलीप उताणे, ज्येष्ठ गांधीवादी डॉ. उल्हास जाजू, डॉ. अरुण पावडे, सुनीता इथापे, माधुरी झाडे, नूतन माळवी, सारिका डेहनकर, हरीश इथापे, शेखर शेंडे, बाळा माऊसकर, राजेंद्र शर्मा, प्रवीण हिवरे, पंकज वंजारे, कोकाटे व अन्य सहभागी झाले होते.