नागपूर- शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावरील हल्ला हा सुनियोजित आहे. गोळ्या घालून खून केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केली. यामागे कोण आहे, हे समोर यायला हवे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रची स्थिती यूपी, बिहार करून ठेवली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज नागपूर येथे बोलत होते.

एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते ? शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे. या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता असल्याचा अरोपही वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा – इटलीचे पार्सल इटलीमध्ये परत पाठवा! बावनकुळे यांचे वक्तव्य

हेही वाचा – धक्कादायक! नागपुरात उद्यानच विकण्याचा घाट… काय आहे प्रकरण जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे. अश्या बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. बाहेर काय सुरू आहे याची जाणीव तरी आहे का? गुंडांना राजाश्रय मिळत असेल तर कायद्याचा धाक त्यांच्यावर का राहणार ? असे वडेट्टीवार म्हणाले.