नागपूर : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात झालेल्या अवकाळी  पावसामुळे तेथून येणाऱ्या आंब्याची अवाक कमी झाल्याने तसेच विदर्भातही अवकाळी पावसाचा आंब्याला फटका बसल्याने या सर्व ठिकाणाहून कमी प्रमाणात आंबे बाजारात येत आहे. त्यामुळे  आंब्याच्या किंमती वाढल्या आहेत. 

विदर्भात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता.  अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांतून आंबा नागपुरात येतो. मात्र  अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने आवक कमी झाली. या शिवाय उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून आंबा नागपुरात येतो. कोकणातून आंबा नागपुरात येतो.

हेही वाचा >>>खुल्‍या जागेवरून झालेल्‍या वादात आई-मुलाची हत्‍या, वडील जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 तसेच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मात्र  एकूणच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने बाजारात आंब्यांची किंमतीत वाढ होताना दिसून येत आहे.. नागपूरच्या  कळमना बाजारात फळमार्केटमध्ये आंब्याच्या दरात 30 ते ४० टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दक्षिणेतून आलेल्या आंब्याचा दर ४० रुपये किलो होता. यावेळेसदर ६० ते ७० रुपये किलोवर गेला आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. गरजेपोटी तो व्यापाऱ्यांना कमी दरात आंबा विकतो. व्यापाऱ्यांकडे तोसाठवणूक करण्याची सोय असल्याने ते टप्प्या टप्प्याने बाजारात आणतात.