वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचे एक्स हे समाजमाध्यमी खाते अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

हेही वाचा – एसटीची चाके थांबणार! नागपुरात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर

हेही वाचा – नागपूर : शहर बस सेवेत १५० ई- बसेस…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार तडस यांनी रामनगर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत एक्स खाते हॅक करण्यात आले असून आपला संपर्क पूर्णपणे तोडण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे हे खाते मी सध्या हाताळत नसून त्याचा उपयोग अज्ञात व्यक्ती करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आपण वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने सदर खात्यावरून काही बरेवाईट किंवा प्रक्षोभक असे लिखाण झाल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यालयीन सहकाऱ्यांनी हे खाते तपासले. तपासणीत नोटीफाय@एक्स डॉट कॉम या अनधिकृत ईमेल आयडीवरून इ-मेल प्राप्त झाला. त्यावर अनवधानाने क्लिक केल्यामुळे खाते हॅक झाल्याची शक्यता आहे. या घटनेचा त्वरित तपास लागावा, तांत्रिक यंत्रणेमार्फत तपास करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार खासदार तडस यांनी दिली आहे. तक्रारीसोबत संबंधित इ-मेल पुरावेदेखील जोडण्यात आलेले आहे.