बुलढाणा: रात्री दीडच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठलो. अंधारल्या बसमधील प्रवासी गाढ झोपेत होते. तेवढ्यात बस उलटली. आम्ही काचा फोडून बाहेर पडलो. बसमधून किंकाळ्या ऐकू येत होत्या आणि काही क्षणातच त्या आर्त किंकाळ्याही थांबल्या.

समृद्धीवर झालेल्या अग्नी व मृत्यूच्या क्रूर तांडवाचा साक्षीदार असलेल्या योगेश गवई याने हा हादरवणारा अनुभव सांगितला. मूळचा मेहकर तालुक्यातील भालेगावचा रहिवासी व मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेल्या योगेशवर देऊळगाव राजा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्याने सांगितले, सध्या संभाजीनगर येथील खाजगी कंपनीत असलेला योगेश हा सहकारी साईनाथ पवार याच्या समवेत नागपूरला गेला होता. ३० जूनला तो नागपूर येथून संभाजीनगरकडे जायला विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये बसला. त्यातील १९ व २० क्रमांकाच्या आसनावर तो आणि पवार बसले होते. रात्री कारंजा लाड येथे जेवण केल्यावर बस पुढे निघाली.

हेही वाचा… मुलाची आवश्यक कागदपत्र घेवून निघालेल्या मातेस अखेर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगेश सांगतो, रात्री दीड, पावणे दोनच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठलो तेंव्हाच बस उलटली व लगेच पेटली. मी साईनाथ व अन्य प्रवासी मिळून काचा फोडल्या अन एकमेकांच्या मदतीने बाहेर पडलो. आणखी एकाला बाहेर काढले. तोपर्यंत बस पूर्ण पेटली. प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकल्या. काही मिनिटातच त्या किंकाळ्याही थांबल्या.