भंडारा: नगर परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच राजकीय उलथा पालथचे सुरू झाली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे शिवसेनेचे लोकसभा युवा सेना अध्यक्ष जाकी रावलानी ज्यांनी भाजपा प्रवेश केला असून शिवसेना शिंदे गटासाठी हा मोठा धक्का बोलले जात आहे. जाकी रवलानी यांचा भाजपातील प्रवेश शिंदे आमदारांसाठी चिंतेची बाब ठरू शकते अशी चर्चा आहेत.
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये जाकी रावलानी यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे बोलल्या जाते. विधानसभा निवडणुकीत सूक्ष्म नियोजनात रावलानी यांचा वाटा महत्वाचा होता, असे सेनेचेच कार्यकर्ते सांगून जातात. शिवसेनेत रावलानी यांचे काम पाहून त्यांना भंडारा लोकसभेचे युवा सेना अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
दरम्यान नगर परिषद निवडणुकीच्या आरक्षणानंतर या मैत्रीत वितुष्ठ आल्याची चर्चा होती, मागील काही दिवसात रावलानी यांनी काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्याचे चर्चा होत्या. अशातच आज जाकी रावलानी यांनी भाजपात प्रवेश करून अनेकांना धक्कातंत्र दिले आहे.
एकीकडे निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सेनेत अनेक जण प्रवेश करीत असताना शिंदे सेनेचे सेनापती पक्ष सोडून जात असल्यामुळे नानाविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेला हा धक्का अधिक ताकद खर्ची घालण्यासाठी लावणारा ठरू शकतो, हे नक्की!