जळगाव – महापालिकेच्या तिजोरीत शनिवारी अवघ्या चार तासांत एक कोटी, १३ लाखांचा धनसंचय झाला. महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता कराच्या वसुलीत मिळणारी सवलत ३१ डिसेंबरपर्यंतच होती. एक जानेवारीपासून थकबाकीच्या रकमेवर दंडाची आकारणी केली जाणार आहे. महापालिकेसाठी २०२२ वर्षाचा अखेरचा दिवस आर्थिक दृष्टीने फलदायी ठरला. पालिका प्रशासनातर्फे करदात्यांच्या सोयीसाठी ३१ डिसेंबर रोजी शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयांसह बाजार वसुली विभाग सकाळी १० ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक : जिंदाल कंपनीच्या भीषण आगीत ११ कामगार गंभीर जखमी, बचावकार्य सुरूच; २५ रुग्णवाहिका तैनात!

हेही वाचा >>> जळगाव : केळीबागांतील चार हजारांवर खोडांचे नुकसान

२०२२-२३ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा भरणा ३१ डिसेंबरपर्यंत भरणार्‍या मिळकतधारकास मालमत्ता करात सवलत देण्यात आली. त्यामुळे शनिवारी अवघ्या चार तासांत एक कोटी, १३ लाखांचा कर भरणा झाला. एप्रिलपासून वर्षअखेरपर्यंत ५१ कोटींचा भरणा झाला आहे. गतवर्षापेक्षा तो अधिक आहे. महापालिका दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीपासून करदात्यांवर दंडात्मक आकारणी करते. यंदाही एक जानेवारीपासून कराच्या रकमेवर दोन टक्के दंड लागू करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 crore 13 lakh collected in jalgaon municipal corporation coffers in four hours ysh
First published on: 01-01-2023 at 17:06 IST