लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला नाशिक आणि जळगावच्या पारोळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या ११ लाख १७ हजार रुपयांच्या २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
आणखी वाचा-अनुदानावर ट्रॅक्टरचे आमिष दाखवून शेतकऱ्याची फसवणूक, संशयिताविरुध्द दोन पोलीस ठाण्यात गुन्हे
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नाशिक शहरातून दुचाकींची चोरी करून जळगाव जिल्ह्यात विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका पथकाला जळगाव परिसरात तपास करण्यासाठी पाठवले. पारोळा पोलिसांच्या मदतीने किशोर चौधरी (३०,रा.पारोळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मुंबई नाका, सातपूर, पंचवटी परिसरातून चोरलेल्या २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या.