मालेगाव शहरात नशेत असणाऱ्या तीन एमडींना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांनी तिघांकडे प्रारंभी एक लाख व तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस नाईक आत्माराम पाटील व सैय्यद राशीद सैय्यद रफिक उर्फ राशीद बाटा यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

मालेगाव शहरातील तीन मित्र रात्री जेवण करून घरी परतत होते. ते एमडी या नशेच्या पदार्थाशी संबंधित असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात नेले.

हेही वाचा- नाशिकमध्ये पक्षांतराचे वारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी निरीक्षक सुरेशकुमार घुसर व पोलीस नाईक आत्माराम पाटील यांनी सैय्यद राशीद सैय्यद रफिक उर्फ राशीद बाटा या खासगी व्यक्तीमार्फत तक्रारदाराकडे सुरूवातीला एक लाख रुपयांची मागणी केली. नंतर तक्रारदाराचा भाऊ व त्याचा एक मित्र यांच्यासाठी ५० हजाराची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात तक्रारादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने सापळापूर्व पडताळणी केली. तेव्हा तिन्ही संशयितांनी तडजोडीअंती पंचासमक्ष २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तिघांविरोधात मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.