शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश रस्ते वाहतूक कोंडीच्या जंजाळात अडकले असून त्यावर सिग्नल व्यवस्था अडथळ्याविना पार करण्याच्या उपायातून उत्तर शोधले जाणार आहे. शहरातील ४८ पैकी २२ सिग्नल परस्परांशी संलग्न केले जातील. त्यामुळे वाहनधारकाला एकाच वेळी विना अडथळा अनेक सिग्नल पार करता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>>नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दगडांवर देवींची चित्रे रेखाटणारा शिक्षक

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीपीए) या उपक्रमातंर्गत शहरात तीन प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जेचा वापर होणार आहे. कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेऊन १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेला शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिग्नल यंत्रणा परस्परांवर आधारीत राखली जाईल. जेणेकरून एका सिग्नलहून मार्गस्थ झालेल्या वाहनधारकाला पुढील सिग्नलवर थांबण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था केली जाईल. एक सिग्नल सुटल्यानंतर त्याची माहिती मार्गावरील पुढील सिग्नलला मिळेल. त्यानुसार विशिष्ट कालावधीत ते हिरवा दिवा अर्थात पुढे जाण्याचा मार्ग खुला करतील. गंगापूर रस्त्याचा विचार केल्यास जुना गंगापूर नाका, जेहान चौक आणि आनंदवल्ली असे तीन सिग्नल आहेत. अशोक स्तंभावरून निघालेल्या वाहनधारकांना कुठल्याही अडथळ्याविना १५ मिनिटात बारदान फाटा येथे पोहचता येईल, असे मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिक- विद्युत) उदय धर्माधिकारी यांनी सांगितले. मुख्य मार्गांवरील सर्व सिग्नल या पध्दतीने परस्परांशी संलग्न असतील. या प्रकल्पात एका सिग्नलसाठी सव्वा दोन लाख रुपये यानुसार २२ सिग्नलसाठी सुमारे ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> दांडीया बघणाऱ्या दोघांवर कोयत्याने हल्ला

सुलभ शौचालयात सौर उर्जेचा वापर
महापालिकेची सहा विभागात ११३ ठिकाणी सुलभ शौचालये आहेत. तिथे सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. एका शौचालयासाठी एक लाख, ३५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ११३ ठिकाणी मिळून सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातून विजेची देखील बचत होणार आहे. मनपा तीनही प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करून राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठविणार आहे. हे प्रकल्प कार्यान्वित होऊन नाशिककरांना उत्तम सेवा मिळेल, अशी ग्वाही धर्माधिकारी यांनी दिली सौर उर्जेच्या वापराने विजेची बचत होऊन हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

घंटागाडी वाहनतळावर सीसीटीव्हीची नजर
शहरात मनपाच्या घंटागाड्या उभ्या राहतात, अशा सहा ठिकाणी म्हणजेच घंटागाडी वाहनतळावर सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नाशिक रोड विभागातील सर्व्हे क्रमांक २४६ मनपा बस डेपो, पश्चिम विभागातील सर्व्हे क्रमांक ४०६ कन्नमवार पुलाजवळ, सिडको नवीन नाशिक भागात मनपा खत प्रकल्पाशेजारी, पंचवटी भागातील मनपा एसटीपी प्रकल्पालगत तपोवन आणि मनपा खत प्रकल्प येथे सीसी टीव्ही कॅमेरे असावेत, अशी मागणी घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली आहे. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ३० लाखाचा खर्च अपेक्षित आहे.