लोकसत्ता वार्ताहर

धुळे: सावकारांच्या छळाला कंटाळून साक्री तालुक्यातील जैताणे येथील शिक्षकाने आत्महत्या केली. या प्रकरणी तिघा कथीत सावकारांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आनंदा चव्हाण (रा.राणे नगर, निजामपूर, साक्री) या शिक्षकाने गावातील संजय न्याहळदे, राकेश भालकारे, रवींद्र न्याहळदे या तिघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशांसह मुद्दल रक्कम तिघांना परत केली असतानाही तिघांनी व्याजाच्या रकमेसाठी चव्हाण यांच्याकडे तगादा लावला होता. दमदाटी केली.

हेही वाचा… धुळ्यात चिकन खरेदीवरुन ग्राहकावर सुऱ्याने वार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सततच्या छळास कंटाळून शिक्षक चव्हाण यांनी रहात्या घरी गळफास घेतला. या प्रकरणी धनराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरुध्द निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संजय न्याहळदे यास ताब्यात घेतले आहे.