जळगाव : मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी तसेच छठ पुजेच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन अमरावती-पुणे, दानापूर-पुणे, नागपूर-पुणे दरम्यान बुधवारी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना जिल्ह्यातील जळगावसह भुसावळ तसेच पाचोरा, चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०१४०४ अमरावती-पुणे ही विशेष गाडी अमरावती स्थानकावरून बुधवारी १२.०० वाजता सुटेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन स्थानकांवर थांबा असेल. चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असणार आहे.

गाडी क्रमांक ०१४०९ पुणे-नागपूर ही विशेष गाडी पुणे स्थानकावरून बुधवारी रात्री ०८.३० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबा असेल. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ११ शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असणार आहे.

गाडी क्रमांक ०१४४९ पुणे-दानापूर ही विशेष गाडी पुणे स्थानकावरून बुधवारी दुपारी ०३.३० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबा असणार आहे. चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.

गाडी क्रमांक ०१४०२ नागपूर-पुणे ही विशेष गाडी नागपूर स्थानकावरून बुधवारी दुपारी ०४.१० वाजता सुटेल. वर्धा, धामणगाव, बदनेरा, मुरटिझापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन स्थानकांवर थांबा असणार आहे. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, १३ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.

गाडी क्रमांक ०१०७९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर ही विशेष गाडी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून रात्री १०.३० वाजता सुटेल. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलिलाबाद या स्थानकांवर थांबेल.

तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.

गाडी क्रमांक ०११४३ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बुधवारी १०.३० वाजता सुटेल. ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबेल. तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.

गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस ही विशेष गाडी बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुभेदारगंज, मिर्जापूर आणि वाराणसीला थांबेल. दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, आठ वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कोचची रचना असेल.