नाशिक – कोण काय बोलतं याला मी महत्व देत नाही. आरोप सिध्द झाले नाही तर राजीनामा मागायचा कसा ? तेलगी घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाले. माझे मंत्री पद गेले पण सीबीआय च्या फायलीत माझे नावही नव्हते. अशा स्थितीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यापेक्षा आरोप सिध्द झाल्यावर मंत्री पदाचा राजीनामा घ्या ही माझी भूमिका असल्याचे माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची भुजबळ वाट पाहत असल्याची चर्चा आहे. याला उत्तर देतांना भुजबळ यांनी सांगितले, आरोप सिध्द नसतांना कोणीही बोलू नये असे भुजबळ यांनी सांगितले. लाडक्या बहिण योजना या विषयी शासनाने निकष जाहिर केले मात्र आता पडताळणीसाठी पुन्हा एकदा जाहिर करण्यात येतील. जेणे करून या योजनेत कोण बसते, कोण नाही हे कळेल. ज्या निकषात बसत नाही त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये किंवा तो मिळावा यासाठी प्रयत्न करू नये असे आवाहन भुजबळ यांनी केले. नाशिक जिल्हा पालक मंत्री पदाचा तिढा कधी सुटेल हे नाही सांगता येत नाही. मात्र आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे विविध घटक एकत्र येत चर्चा , नियोजन करत आहे हे चांगले आहे. कामाला या मुळे गती मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील शासकिय मराठी भाषेत बोलण्याचा निर्णयाची अंमलबजावणी योग्य आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथली भाषा आपल्याला यायला हवी. यात गैर काय? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.