नाशिक – घराजवळ कचरा जाळण्यास विरोध केल्यामुळे संतप्त टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना भद्रकालीतील कोकणीपुरा भागात घडली. या प्रकरणी नऊ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी लाकडी दांडके व सळईचा वापर करण्यात आला.

कोकणीपुरा भागातील समाज मंदिरासमोर ही घटना घडली. तक्रारदार महिलेच्या घराजवळ टोळके कचरा जाळत होते. हे लक्षात येताच महिलेने कचरा जाळण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवली. टोळक्याने महिलेचा पती, सासऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. लाकडी दांडके, सळईचा वापर करण्यात आला. मारहाणीत भ्रमणध्वनी गहाळ झाला. संशयितांनी विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अली कोकणी, अयान कोकणी, गुलामगौस कोकणी, इम्रान कोकणी, गुलजार कोकणी, रज्जाक कोकणी, मोईन कोकणी, फुजेर कोकणी, हुसैन कोकणी (सर्व रा. कोकणीपुरा, भद्रकाली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – सातपुड्यात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची वीस किलोमीटर पायपीट कशासाठी ?

हेही वाचा – पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्रांची सांकेतांकाने पडताळणी दृष्टीपथात, बुधवारी मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात वितरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचरा जाळण्यास प्रतिबंध

प्रदूषण रोखण्यासाठी शहरात कचरा जाळण्यास प्रतिबंध आहे. कचरा जाळताना कुणी आढळल्यास महानगरपालिकेतर्फे संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाते. असे असले तरी अनेक भागांत कचरा जाळला जातो. उपरोक्त घटना अतिशय दाटीवाटीच्या रहिवासी भागात घडली. कचरा जाळण्यास विरोध केल्यावरून उद्भवलेल्या वादात नागरिकांना मारहाण झाली. या प्रकरणात महापालिका तशा कारवाईसाठी पुढाकार घेईल की नाही, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.