जळगाव: सध्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाकडून दीपावली आणि छटपूजा या सण-उत्सवांसाठी अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या मुंबई, नागपूर, जयपूर, दानापूर या मार्गांवर धावणार आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून दीपावली व छटपूजेसाठी अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात नागपूर-मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- दानापूर आणि दुर्गापुरा (जयपूर)- दौंडदरम्यान सात अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या धावणर असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. नागपूर-मुंबई एकेरी विशेष गाडी १६ नोव्हेंबरला नागपूरहून रात्री दहाला सुटेल आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल. २४ डबे असलेली ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे व दादर येथे थांबणार असून, गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, आठ सामान्य द्वितीय श्रेणी असे डबे असतील.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
panvel nanded trains marathi news, 40 trains panvel to nanded marathi news
पनवेल – नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

हेही वाचा… धुळ्यातील ३०२ गावांना संभाव्य टंचाई; जिल्हा आराखडा तयार

मुंबई-दानापूर अतिजलद विशेष गाडी १८ आणि २५ नोव्हेंबरला दोन फेऱ्यांमध्ये धावणार आहे. ती मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सकाळी ११.५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी दोनला पोहोचेल. दानापूर- मुंबई अतिजलद विशेष गाडी १९ आणि २६ नोव्हेंबरला दोन फेऱ्यांमध्ये धावणार असून, दानापूर येथून दुपारी साडेचारला सुटेल आणि ती मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाअकराला पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबणार असून, गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान यासह आठ सामान्य श्रेणीचे डबे असतील.