लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nashik Brahmagiri Shravan Somwar: श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात एकिकडे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असताना ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठीही भाविक येत आहेत. मोठ्या प्रमाणावर भाविकांनी रविवारी रात्रीच प्रदक्षिणेला सुरुवात करुन सोमवारी सकाळी ती पूर्ण केली. तर अनेक भाविक सोमवारी दिवसा प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकमध्ये आले आहेत.

त्र्यंबकेश्वर येथे पहिल्या दोन श्रावण सोमवारी अपेक्षित गर्दी होऊ शकली नाही. परंतु, तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची चांगलीच गर्दी झाली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पिण्याचे पाणी, तसेच जलरोधक तंबूचे कापड आदी व्यवस्था करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा… नाशिक- पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने तीन सप्टेंबरपासून त्र्यंबकसाठी २५० जादा बसचे आयोजन करण्यात आले. त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ब्रम्हगिरी प्रदक्षिणा सोमवारी सकाळी पूर्ण करणारे भाविक परतीच्या मार्गावर लागले असताना इतर भाविक दिवसा प्रदक्षिणेच्या वाटेला लागले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd of devotees for pradakshina at brahmagiri on the third shravan somwar dvr
First published on: 04-09-2023 at 11:38 IST