धुळे : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेशासाठी कुठे कुठे जात आहेत, कोणाच्या भेटी घेत आहेत, कोणाला गळ घालत आहेत, हे माहीत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे, असा दावा धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आपण अतिशय विश्‍वासाने बोलत असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

गणेशोत्सवानिमित्ताने शहरातील विविध मंडळांना भेटी देण्यासह आरती करण्यासाठी महाजन येथे आले होते. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा नगरसेविका जयश्री अहिरराव, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, कमलाकर अहिरराव आदी उपस्थित होते.

हेही वाचा : नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी स्तनपान, पोषणावर भर, आरोग्य सेवक प्रशिक्षणासाठी ८९ जणांची निवड

खडसे हे कोणाशीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत. शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचे ते सांगत असले तरी त्यात तथ्य नाही. ते अजित पवार यांच्याकडे पक्षात घेण्यासाठी आग्रह करत आहेत. ते भाजपमध्ये परतण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांना गळ घालत आहेत. खडसेंनी अन्य पक्षांमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा सध्या ज्या पक्षात आहेत, त्या ठिकाणीच सुखी रहावे, असा टोलाही महाजन यांनी लगावला.

हेही वाचा : देखावे पाहण्यासाठी जळगावात जनसागर; गणेशोत्सवादरम्यान व्यावसायिकांनाही लाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा नाराज, तो नाराज, असे बोलण्यापेक्षा खडसेंनी त्यांचे राजकीय भविष्य काय, ते बघावे. त्यांनी त्यांचा पक्ष बघावा. अजित पवार नाराज नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. यामुळे हिम्मत असेल तर खडसेंनी लोकसभेची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही महाजन यांनी दिले.