scorecardresearch

थकबाकीमुळे विद्यालयाविरुद्ध धुळे मनपाची कारवाई

१२ वर्षांपासून महापालिकेचा तब्बल पाच लाख ८५ हजार २१ रुपये एवढा मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली.

Dhule mnc action against school
थकबाकीमुळे विद्यालयाविरुद्ध धुळे मनपाची कारवाई (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

धुळे – शहरातील साक्री रस्त्यावरील सुदाम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट संचालित श्रीमती शांताबाई पिंगळे विद्यालयाच्या कार्यालयाविरुद्ध महापालिकेच्या वसुली पथकाने कारवाई केली. १२ वर्षांपासून महापालिकेचा तब्बल पाच लाख ८५ हजार २१ रुपये एवढा मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली.

पालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त नितीन कापडणीस यांनी शहरातील मालमत्ता धारकांकडून थकीत वसुलीसाठी धडक मोहीम राबविली आहे. यासाठी स्वतंत्र वसुली पथकाची स्थापना करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी शहरातील साक्री रस्त्यावर असलेल्या श्रीमती शांताबाई पिंगळे विद्यालयात जाऊन पथकाने थकबाकीची मागणी केली. ही रक्कम तात्काळ भरण्यास असमर्थता दर्शविण्यात आल्याने विद्यालय गोठविण्याची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – जळगाव : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – जळगाव : जिल्हाध्यक्षांविरोधातील कारवायांची नोंद घेणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा

धुळेकरांनी पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केले आहे. ही कारवाई वसुली अधिकारी शिरीष जाधव, मधुकर निकुंभे, निरीक्षक मधुकर चिलंदे, अनिल जोशी, अशोक चौधरी, अशोक सूर्यवंशी, किशोर शिंदे, विद्याताई कर्डक, श्रीमती पटाईत यांच्या पथकाने केली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 14:46 IST

संबंधित बातम्या