जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी गुरुवारी अर्ज भरण्यापूर्वी सासरे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी खडसे यांनी सून नव्हे; मुलगी रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रक्षा यांनी १० वर्षांत लोकसभा सभागृहात व मतदारसंघात चांगले काम केले आहे.

हेही वाचा >>> असे बरेच भुरटे आमच्यातून गेले… शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे कोणाविषयी म्हणाले ?

रक्षा या सून आहेत. सून म्हणण्यापेक्षा मुलगीच आहे. कुटुंबातील सदस्या आहेत. त्यांना मतदारसंघातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपला भाजपप्रवेश अद्याप झाला नसला, तरी आपण भावी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज भरण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी, समोर कोणी जरी उभे असले, तरी या निवडणुकीकडे जनता विकासाच्या दृष्टीने बघते आहे, असे सांगितले. अर्ज भरण्यापूर्वी स्मिता वाघ काय म्हणाल्या ? महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगाव मतदारसंघातून अर्ज भरण्यापूर्वी देवदर्शन केले. मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वात सरकार पक्षात काम करण्याची संधी मिळाली, तर यापेक्षा काही मोठे नाही, असे वाघ यांनी नमूद केले.