धुळे : शहरासह जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा, अशी सूचना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केली आहे. रात्री १२ पर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे मंडळांच्या गणेशांचे विसर्जन होईल. अनुचित प्रकार घडू नये म्हणून ७०० सीसीटीव्ही कॅमेरे, पाच ड्रोन कॅमेरे मिरवणुकीवर नजर ठेवणार असून पुरेसा बंदोबस्त असेल, अशी माहितीही बारकुंड यांनी दिली.

हेही वाचा : धुळे जिल्ह्यात बनावट दारु कारखाना उध्वस्त; १० लाखांचा मुद्देमाल नष्ट

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
global capital market, samir arora, mutual fund, samir arora journey in market, samir arora and global market journey, samir arora work, helios mutual fund, alliance capital management, asset management comapanies, hdfc limited, hdfc bank, samir arora thoughts in hdfc merge,
बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

पोलीस निरीक्षक,सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अमलदारांसह अन्य कर्मचारी विसर्जन मिरवणुकीच्या नियोजित मार्गांवर तैनात असतील. मंडळांनी पारंपरिक पद्धतीच्या वाद्यवृंदाचा वापर करुन मिरवणुकांना शक्यतो लवकर सुरुवात करावी, असेही बारकुंड यांनी सांगितले. रात्री बारापर्यंत विसर्जन पूर्ण होणे अपेक्षित असून मंडळांनी आपले फलक, झेंडे काढून घ्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. ३० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ईदनिमित्त मिरवणूक निघेल. या मिरवणुकीचा समारोप दुपारी दीड वाजता होईल. तीन फूटापेक्षा अधिक उंचीचा मिरवणूक झेंडा असू नये, असेही त्यांनी नमूद केले.