नाशिक: पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लासलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक कैलास बिडगर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कैलास बिडगर (४२) याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी त्याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पोलीस नाईक बिडगरला पथकाने पकडले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : फसवणुकीसाठी ‘लष्कर ए तय्यबा’ नावाने भ्रमणध्वनी, धुळ्यात दोघांना अटक

Inspection of Tejas Garge house in Mumbai nashik
तेजस गर्गेच्या मुंबईतील घराची तपासणी
nashik, 3 workers death
गुजरातमधील अपघातात नाशिकच्या तीन मजुरांचा मृत्यू
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Dhule Lashkar e Taiba marathi news
फसवणुकीसाठी ‘लष्कर ए तय्यबा’ नावाने भ्रमणध्वनी, धुळ्यात दोघांना अटक
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Ajit-pawar-lok-sabha-Election-result_4a656f
बारामतीचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी? ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचं सहावेळा ‘हे’ वक्तव्य

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात हवालदार संदीप वणवे, शिपाई संजय ठाकरे, चालक परशुराम जाधव यांचा समावेश होता. दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कुणीही कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी ०२५३ – २५७८२३० अथवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.