नाशिक: म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्सजवळील पटांगणात एका युवकाचा मृतदेह आढळला. अनैतिक संबंधातून युवकाची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून पोलिसांनी रविवारी दुपारपर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले.

प्रशांत तोडकर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) रिक्षाचालक होता. तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. शनिवारी दिवसभर तो घरीच होता. रात्री घराबाहेर पडला होता. घटनेची माहिती सकाळी पोलिसांकडून युवकांच्या कुटूंबियांना समजली. प्रशांतच्या पश्चात दोन भाऊ, बहीण, आई, वडील आहेत.

हेही वाचा: त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रमाणपत्र, अंनिसचा आक्षेप; दुकानदारांची नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी पाहणी केली. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याचा अंदाज असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.