नाशिक : मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफ) आरक्षित तिकिटांचा काळाबाजार आणि दलालांना रोखण्यासाठी तसेच अधिकृत प्रवाशांचे हित जपण्यासाठी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यात २६९ गुन्ह्यांची नोंद तर, ३१७ जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर विभागाकडून मिळालेली माहिती आणि इतर पूरक माहिती आधारे मध्य रेल्वेचे सुरक्षा पथक छापे टाकत आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील खासगी वाहतूकदारांच्या आवारात हे छापे टाकण्यात आले.

हेही वाचा : पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सरपंच नोंदणीत नाशिक आघाडीवर

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
loksatta explained article, crude oil price, hike, Iran Israel conflict, india, on petrol diesel prices
विश्लेषण : इराण-इस्रायल संघर्षातून खनिज तेलाचा भडका… भारतात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ?
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा

एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दलालीच्या २६९ गुन्ह्यांची नोंद करण्यात येऊन आतापर्यंत ३१७ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रु. ३.४२ लाख दंड वसूल करण्यात आला. या २६९ प्रकरणांपैकी २३ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत एकट्या मुंबई विभागात ९७ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत ११७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात ७२ गुन्हे दाखल झाले असून ७७ जणांना अवैध धंदे प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने ५६ गुन्हे दाखल करून ७४ जणांना अटक केली, नागपूर विभागात ३६ गुन्ह्यांसह ४१ जणांना अटक, सोलापूर विभागात आठ गुन्हे दाखल करून आठ जणांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : भुसावळ रेल्वे विभागाला एकाच दिवशी ५० लाखांचे उत्पन्न, तिकीट तपासणी मोहीम

मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाचा आयटी विभाग आणि कौशल्य विकास केंद्र प्रबळ विविध सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. जे तिकिटांचा काळाबाजार उघड करण्यास सहाय्य करते. मागील वर्षाच्या याच कालावधीत रेल्वे सुरक्षा दलाने दलालीच्या १७८ प्रकरणांची नोंद केली होती. २०८ जणांना अटक करून रु.६.६४ लाख दंड वसूल केला होता. मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन ई-तिकीट प्रकरणात गुंतलेल्या दलालांकडून तिकीट खरेदी करणे महागात पडू शकते. अशा तिकिटावर प्रवास केला जाऊ शकत नाही. कायदेशीर कारवाईमुळे तिकीट रद्द केल्यास आर्थिक नुकसानीचा फटका प्रवाशांना बसू शकतो.