नाशिक : महायुतीतील जागा वाटपाच्या घोळामुळे रखडलेल्या नाशिक लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये रंगल्याचे समोर आले आहे. माघार घेतल्यानंतर सोमवारी रात्री त्यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. मोटारीत टॅबवर ते आयपीएलचे सामने बघत होते. आपण क्रिकेट सामना बघत असून मंगळवारी सविस्तर बोलू असे सांगत त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करणे टाळले.

खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांव सुचवूनही नाशिकच्या जागेवर महायुतीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देता आली नाही. निर्णय घेण्यास उशीर होत असल्याचे कारण देत भुजबळ हे स्वत:च स्पर्धेतून बाजूला झाले. त्यांच्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. तथापि, भाजपने या जागेवर पुन्हा दावा सांगितल्याने महायुतीतील घोळ कायम आहे. उमेदवाराची घोषणा करण्यात बराच विलंब झाल्यामुळे भाजपही नाराज आहे. भाजपच्या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत माघारीची घोषणा केल्यानंतर छगन भुजबळ हे सोमवारी रात्री प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले. प्रवासात ते आयपीएलचे क्रिकेट सामने पाहण्यात मग्न होते. भुजबळ फार्म येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधताना त्यांनी राजकीय प्रश्न टाळून टॅबवर आयपीएल क्रिकेट सामन्याचा स्क्रिन दाखवला. सध्या क्रिकेट सामन्याचा आनंद घेऊ द्या, मंगळवारी सविस्तर बोलू असे सांगत त्यांनी फारसे बोलणे टाळले.

Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
How did Indian mango reach China and Pakistan?; India and China face off over mangoes
India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?
wfi to challenge delhi hc
उच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील कुस्तीगिरांचे भवितव्य धोक्यात; भारतीय कुस्ती महासंघ आदेशाला आव्हान देणार
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “पोलीस आमच्यापेक्षाही वेगाने पळून गेले”, कोलकात्यातील रुग्णालयात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी परिचारिकांची संतप्त प्रतिक्रिया!
bangladesh mourning day
बांगलादेशात १५ ऑगस्ट राष्ट्रीय शोक दिवस म्हणून का पाळतात? अंतरिम सरकारने या दिवसाविरुद्ध घेतलेल्या नव्या निर्णयाने वाद का पेटलाय?
vandana chavan eknath shinde marathi news
उद्धव ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांकडे कोणी केली मागणी?
What is CAS in Paris Olympics 2024
What is CAS : विनेश फोगट अपात्र प्रकरणावर निर्णय देणारे CAS नेमकं काय आहे? जाणून घ्या

हेही वाचा : नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत

दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. भुजबळ फार्म येथे ही बैठक होईल. त्यात भुजबळ हे सहभागी होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बैठकीत भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्याबाबत झालेला विलंब, अखेरीस घ्यावी लागलेली माघार यावर मुख्यत्वे चर्चा होण्याचा अंदाज आहे.