नाशिक: मागील काही दिवसांत जिल्ह्यात जवळपास १० जणांचा वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला. रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी बुडालेल्या दोन पर्यटकांचे मृतदेह सोमवारी व मंगळवारी हाती लागले. जिल्ह्यात धरण परिसर व बंधाऱ्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून सर्वांनी आवश्यक ती खबरदारी द्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

मागील काही दिवसांत धरण, तळे वा तत्सम ठिकाणी भ्रमंती वा आंघोळीसाठी जाणाऱ्या १० जणांना पाण्यात बुडून प्राण गमवावे लागले. रविवारी मुंबईतील पर्यटकांपैकी एक सिद्धेश गुरव हा युवक वावी हर्ष येथे वैतरणा धरण क्षेत्रात बुडाला होता. त्याचा मृतदेह सोमवारी मौजे झारवड येथे सापडल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी सांगितले. रविवारी दुसऱ्या घटनेत धबधब्याच्या डोहात मुफद्दलाल हरहरवाला (४५, मुंबई, अंधेरी) ही व्यक्ती बुडाली होती. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वैतरणा धरणातील प्रवाह नियंत्रीत करून सोमवारी बचाव कार्यास सुरुवात करावी लागली. मंगळवारी संबंधिताचा मृतदेह हाती लागला. गेल्या आठवड्यात भावली धरणात तीन मुली व दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. हरणबारी धरणात मासे पकडण्यासाठी गेलेला दत्तू सोनवणे (१८) पाण्यात बुडाला. तर सिन्नर तालुक्यातील देवनदीवरील कुंदेवाडी येथील बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेला सार्थक जाधव (१४) आणि अमित जाधव या सिन्नरच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मेच्या अखेरीस बहुतांश धरण, जलाशयांची पातळी कमी झालेली आहे. अशा स्थितीत पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.

pune Porsche care accident minor accused
“मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्या डॉक्टरची धमकी!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Narendra modi
“सहा महिन्यांनी मोठा राजकीय भूकंप होणार”, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis
Maharashtra News : “बोलायला नाही, कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते”, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर; सादर केली ‘ही’ आकडेवारी!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

हेही वाचा : मुंबईतील पर्यटकाचा वैतरणा धरणात बुडून मृत्यू, एक बेपत्ता

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

पाण्याच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे. कुणी गेले तरी आणि पोहता येत असेल तरीही जीवरक्षक जॅकेट घातले पाहिजे. धोकादायक ठिकाणी अतिसाहस टाळावे. माहिती नसलेल्या ठिकाणी खोल पाण्यात उतरू नये. पाण्यात उतरणे गरजेचे असल्यास आवश्यक ती साधन सामग्री सोबतीला ठेवावी. धोकादायक ठिकाणी छायाचित्र वा सेल्फी काढणे टाळावे. वाहनाने भ्रमंती करीत असल्यास टायर-ट्यूब, मजबूत दोरखंड सोबत ठेवावा. वेळप्रसंगी त्या उपयुक्त ठरू शकतात याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लक्ष वेधले आहे.