नाशिक : शहरात गोदाकाठावरील कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी पाहता वाहतूक शाखेच्या वतीने मंदिर परिसराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मंदिराला विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्याचे काम सुरू आहे. शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते.

गर्दीमुळे कपालेश्वर मंदिर, पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सरदार चौक, काळाराम मंदिरासह अन्य ठिकाणच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे शुक्रवारी पहाटे पाच ते रात्री १२ या वेळेत परिसरातील रस्ते वाहनांसाठी बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : नाशिकमध्ये पुन्हा बिबट्यांची दहशत; वडजाईमाता नगरमध्ये तीन बिबट्यांचे दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक बंद राहणारे रस्ते

ढिकले सार्वजनिक वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिर
मालेगाव स्टँडकडून कपालेश्वर मंदिर
सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिर
गाडगेमहाराज पुलाकडून कपालेश्वर मंदिर