नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला इच्छुकांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे. काहींनी अवघ्या मतदारसंघात आरती संग्रहाच्या प्रति वितरित केल्या तर, काहींनी पीडीएफ स्वरुपात भ्रमणध्वनीवर पाठवत खर्चात बचत केली. गणेशभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी इच्छुकांंनी सर्वत्र फलकबाजी करुन शहराच्या सौंदर्यात बाधा आणली आहे. काही जण ढोल-ताशा महोत्सवातून आपली दावेदारी मजबूत करीत आहेत.

विधानसभा निवडणुकीची धामधूम लवकरच सुरू होत असल्याने इच्छुकांनी गणेशोत्सवाची संधी साधत जणू प्रचाराचा नारळ फोडल्याचे चित्र आहे. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली या चारही विधानसभा मतदार संघात इच्छुकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड चालवली आहे. महायुती वा महाविकास आघाडीत जागा वाटप झालेले नाही. विद्यमान आमदारांना स्वपक्षीय, मित्रपक्षातील इच्छुकांनी आव्हान देण्याची तयारी चालवली आहे. नाशिक मध्यच्या जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार आणि माजी स्थायी सभापती संजय चव्हाण यांनी उडी घेतली. शेलार यांनी घरोघरी छापील आरती संग्रहाचे वाटप केले. तर चव्हाण यांनी शुभेच्छा फलक उभारले. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी नाशिक ढोल-ताशा महोत्सवातून शक्ती प्रदर्शन केले. आमदार देवयानी फरांदे यांचा हा मतदारसंघ आहे. भाजपच्या ताब्यातील या जागेवर शिंदे गटाचे लक्ष आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही आधीच मिसळ पार्टीतून उमेदवारीचे संकेत दिले होते. गणेशोत्सवात त्यांचे समर्थक फलकरुपी शुभेच्छा देण्यासाठी सरसावले आहेत.

Chandrapur Assembly Constituency, Brijbhushan Pazare,
चंद्रपूरसाठी भेटीगाठींना जोर
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
ajit pawar silence on udgir
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मंत्र्याच्या मागणीनंतरही अजित पवारांचे मौन
Amit Shah visit, Ganesh Naik, Amit Shah latest news,
अमित शहांचा दौरा गणेश नाईकांसाठी फलदायी ?
Campaigning ends for final phase of J-K Assembly elections
जम्मूकाश्मीरमध्ये प्रचाराची सांगता ; अखेरच्या टप्प्यासाठी उद्या मतदान, प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षखरगेंची प्रकृती बिघडली
Amit Shah Nagpur, Nitin Gadkari in Kashmir,
अमित शहा नागपुरात, गडकरी काश्मिरमध्ये, तर्कवितर्कांना ऊत
Navi Mumbai, Uran, Panvel constructions
प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय
Marathwada bjp amit shah marathi news
मराठवाड्यात भाजपने कंबर कसली, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

हेही वाचा : कोथिंबिरीचा उच्चांक! घाऊक बाजारात १७० रुपये जुडी

नाशिक पश्चिम मतदारसंघाचे भाजपच्या आमदार सिमा हिरे या प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणी भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठी आहे. यातील एक भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश प्रभारी प्रदीप पेशकार यांनी पीडीएफ स्वरुपातील आरती संग्रहातून मतदारांसमोर विकासाची भूमिका मांडली. दिनकर पाटील यांच्याकडून लोकसभेला हुकलेली संधी विधानसभेत साधण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्यासह माजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी अवघ्या मतदारसंघात फलकबाजी केली. स्वकीय स्पर्धकांना आमदार हिरे यांनी फलकांमधून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर हे देखील फलकबाजीत मागे नाहीत. नवीन नाशिक परिसर त्यांच्या फलकांनी व्यापला आहे. माजी महापौर दिनकर पाटील, माजी आमदार अपूर्व हिरे यांचे फलक या भागात आहेत. नाशिक पूर्व मतदारसंघही त्यास अपवाद नाही. भाजपच्या ताब्यातील या जागेवर याच पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी सभापती गणेश गिते, उद्धव निमसे इच्छुक आहेत. इच्छुकांनी विविध उपक्रमातून, फलकांद्वारे प्रचार चालवला आहे.

हेही वाचा : नाफेडकडून कांदा खरेदी व्यवहारांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत पडताळणी

लष्करी परिसरात फलकबाजी कमी

देवळाली मतदारसंघात वेगळी स्थिती नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्ष्मण मंडाले, माजी शासकीय अधिकारी डी. वाय. पगारे यांचे फलक आहेत. या मतदारसंघात इच्छुक राजश्री अहिरराव यांच्यासह अन्य काहींचे फलक रिक्षाच्या मागील बाजुला दृष्टीपथास पडतात. छावणी मंडळ परिसरात फलकासाठी शुल्क असल्याने लष्करी अधिपत्याखालील परिसर काहीसा मोकळा आहे. काहींनी वीज खांब, तत्सम जागेवर स्टिकर्सद्वारे प्रचार चालवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप यांच्यासह बहुतांश इच्छुक दररोज विविध मंडळांना भेटी देतात. त्यांच्याकडून निवडणुकीआधी कार्यकर्त्यांचे संघटन करण्यावर भर दिला जात आहे.