नाशिक – ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे आणि सहायक संचालिका आरती आळे यांची नावे लाच प्रकरणात आली. या प्रकरणआस १५ दिवसांचा कालावधी उलटूनही गर्गे अद्याप फरार आहे. मुंबई येथील त्यांच्या घराची तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता तीन लाख १८ हजार रुपये रोख आणि अन्य काही सामान सापडले आहे.

गर्गे १५ दिवसांपासून फरार आहेत. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गर्गे यांच्या मुंबई येथील घराची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा…गुजरातमधील अपघातात नाशिकच्या तीन मजुरांचा मृत्यू

यावेळी गर्गे यांच्या पत्नी उपस्थित होत्या. घरझडतीत पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील बँक खाते, तसेच त्यांच्या पत्नीचे मुंबई येथील बँकेचे तपशील मिळून आले. तीन लाख १८ हजार रुपये रोख, तीन हार्डडिस्क, गर्गे व त्यांच्या पत्नीचे पारपत्र मिळाले आहे.