लोकसत्ता वार्ताहर
धुळे: शिंदखेडा येथे १३ वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेतला. शिंदखेडा टपाल कार्यालयासमोर ही घटना घडली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
खुशाल उर्फ बिट्टू सोनवणे (१३) असे या मुलाचे नाव आहे. गुरुवारी त्याने त्याच्या घरातील शयनगृहात ओढणी बांधून गळफास घेतला. त्याला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी प्रथमदर्शी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.